रोहा : थंडीच्या हंगामात अंड्यांची मागणी वाढते. पर्यायाने भावही चढे असतात. यंदा रायगड जिल्ह्यात उलट चित्र आहे. महिनाभरात 20 टक्क्यांनी भाव घसरले आहेत. त्यामुळे अंडीप्रेमींसाठी ही खूशखबर आहे. वातावरणातील चढ-उतारामुळे ही घसरण झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
2 जानेवारीला अंड्यांचे घाऊक भाव शेकडा 512 रुपयांपर्यंत होता. त्यामुळे किरकोळ बाजारात एक अंडे 6 रुपये अशा चढ्या भावात विकण्यात येत होते. आज 100 अंड्यांचा घाऊक बाजरभाव 417 रुपये आहे, तर किरकोळ बाजारात 5 रुपयांना 1 अंडे असा भाव आहे.
यंदाच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला होता. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन घटले होते. आता पोल्ट्री व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर आला असून अंड्यांची आवक वाढली असल्याचे अंडी व्यावसायिक नागेश तवटे यांनी सांगितले.
महिनाभर तापमानाचे आकडे सातत्याने वरखाली होत आहेत. त्यामुळेही अंड्यांच्या मागणीवर परिणाम झाला असून अंडी स्वस्त झाली असल्याचे मत कोलाड येथील अंडी व्यावसायिक नकील म्हसलाई आणि "प्रीमियम चिकन'चे व्यवस्थापक मिलिंद मोंडे यांनी सांगितले.
अंडी खाल्ल्याने होणारे फायदे
- अंड्यातील पांढरा भाग खाल्ल्याने आपणास लवकर भूक लागत नाही.
- विटामिन-डी, कॅल्शियाम आणि फॉस्फरस हे घटक अंड्यात असतात. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
- दृष्टी सुधारण्यासाठी लागणारे विटामिन-ए हे अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात असते.
- मेदूच्या वाढीसाठी लागणारे ओमेगा-3 फैटी ऍसिड आणि विटामिन-बी 12 हे घटक अंड्यामध्ये उपलब्ध असतात.
- अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्र बदलू लागले आहेत. त्यामुळे अंड्यांच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहेत. सध्या हे भाव उतरलेले आहेत.
- मिलिंद मोंडे, व्यावसायिक.
थंडीच्या हंगामात दरवर्षी अंड्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा ते कमी झाल्याचे समाधान वाटत आहे.
- मारुती माळी, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.